या कथा भारतीय निवडणुकीतील चमत्कारांवर बोट ठेवतात. त्यातील विस्मित करणारे वैविध्य आणि गुंतागुंत उत्कटपणे टिपतात
‘दबा धरून’ या कथेत नक्षलग्रस्त भागात निवडणुकीशी संबंधित ड्युटी करताना पोलिसांच्या सैन्यदलाला जे धोके पत्करावे लागतात, त्यांचे क्लेशदायी अनुभव व्यक्त होतात. ‘कर्तव्याची हाक’ ही कथा दूरवरच्या दुर्गम प्रदेशात मतदान घेणाऱ्यांना करावे लागणारे शारीरिक कष्ट, गीरच्या जंगलात केवळ एका मतदारासाठी उभे केलेले मतदान केंद्र, या गोष्टी रेखीवपणे उलगडून दाखवते.......